ग्रामीण जीवन आणि प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत आमचा जीवन प्रवास यशस्वी झाला. वडिलांचा धाक, आईचे कष्ट, भावडांचे प्रेम, पतीचा खंबीर पाठिंबा, शिक्षकांचे मार्गदर्शन, सासरच्या माणसांचा आधार, ग्रामोन्नती मंडळ नारायणगाव संस्थाचालकांची प्रेरणा, महाविद्यालयातील प्राध्यापकाचे सहकार्य, विद्यार्थ्यांचा आदर, समाजाचा जिव्हाळा, परमेश्वराची कृपा माझ्या मुर्लीचा त्याग या सर्वांचा माझ्या जडणघडणीत महत्वाचा वाटा आहे. लग्न झाले तेव्हा १२ वी पर्यंत शिक्षण झाले होते, नंतर संसार, शिक्षण, मातृत्व आणि कर्तृत्व यामध्ये तारेवरची कसरत करावी लागली. माझ्या आयुष्यातील या आठवणी मी शब्दरूपाने वाचकांच्या हाती सोपवतांना आनंद होत आहे.
- प्रा. डॉ. मंगल एकनाथ डोंगरे
0 REVIEWS FOR पुस्तकाचे नाव : मांगल्य