राज्यशास्त्रात `राजकीय समाजशास्त्र` हा अभ्यासविषय आधुनिक काळात समाविष्ट झालेला आहे या विषयात सामाजिक रूढी-परंपरा धर्म संस्कृती देश अथवा समाजाची आर्थिक स्थिती इ सर्व घटकांचा राजकीय व्यवस्थेवर राजकारणावर होणारा परिणाम अभ्यासला जातो. राजूरच्या मुस्लिमांच्या राजकीय विकासाचा अभ्यास करावयाचा तर इस्लाम धर्माचा उदय, त्याचे तत्वज्ञान, इस्लामचा राजकीय इतिहास यांचा अभ्यास करणे क्रमप्राप्त आहे. त्या दृष्टीने सदर पुस्तकाच्या सुरुवातीला वरील घटकांच्या अभ्यासाची मांडणी केलेली आहे त्यानंतर राजूरच्या मुस्लिमांच्या सामाजिक आर्थिक व शैक्षणिक स्थितीचा अभ्यास केलेला आहे अंतिम टप्प्यात मुस्लिमांच्या राजकीय विकासावर इस्लामी तत्वज्ञान, मुस्लिमांचा राजकीय इतिहास, इस्लामी संस्कृती, राजूरच्या मुस्लिमांची सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक स्थिती इ घटकांचा झालेला परिणाम व त्यांच्या राजकीय विकासाचे वास्तव मांडलेले आहे.
0 REVIEWS FOR पुस्तकाचे नाव : राजूरमधील मुस्लिमांचा राजकीय विकास