`निब्बाणाची वाट` म्हणजेच माणसाच्या जीवनाची वाट होय. `निब्बाण` जगण्याचा विचार करते. बुद्धाच्या तत्त्वज्ञानातील निम्बाण ती याच जन्मात अनुभवण्याची गोष्ट असते. मनःशांती, जीवनसुखाची सर्वोच्च अवस्था अनुभवण्याचा तो क्षण असतो. सुख माणसाला हुलकावण्या देत असतं अन् दुःख गिळण्याचा प्रयत्न करीत असत. या उन सावलीच्या खेळात माणूस खूप शिकतो. माणूस प्रेम करतो, निसर्गात रमतो, गाव अन् शहरात एकांतात अन् समुहात वावरताना कधी जवळच्या माणसांकडून दुखावला जातो तर कधी सुखावतोही. माणूस बरंच पाहतो, न्याहाळतो, कधी कधी सत्यही दृष्टिआड करतो. अशा माणसांच्या मनातल्या भावना या दोन ओळींच्या रचनाबंधात आणण्याचा माझा प्रयत्न आहे.
-विठ्ठल शिंदे
0 REVIEWS FOR पुस्तकाचे नाव : निब्बाणाची वाट