आठवणींचा डोह या पुस्तकाचा नायक केवळ सुनील गोसावी नाहीत तर सुनील यांच्या सामाजिक जगण्यात जी जी भली माणसं आली. जे जे संघर्ष आले ते या पुस्तकाचे नायक बनले आहेत. याचाच अर्थ या पुस्तकातल्या सुनील गोसावी यांच्या आठवणी केवळ त्यांच्या नाहीत तर त्या त्यांनी अनुभवलेल्या सांस्कृतिक पटलाच्या आठवणी आहेत.
हे लेखन स्थानिक इतिहास लेखनाचा अपेक्षित नमुना नक्कीच आहे. या पुस्तकात ग्रामसंस्कृतीचे समर्पक वर्णन आहेच, परंतु या पुस्तकात अनेक उर्जावान माणसांच्या कार्याचा आढावाही मांडला आहे. या अर्थाने हे पुस्तक अहमदनगर जिल्ह्याचा वर्तमान सामाजिक-सांस्कृतिक इतिहास मांडणारे आहे. स्थानिक आणि प्रादेशिक इतिहास लेखनाचा आश्वासक नमुना म्हणून हे पुस्तक मला अनेकार्थाने महत्त्वाचे वाटते. सुनीलसारखे असंख्य कार्यकर्ते जेव्हा जेव्हा आपल्या जीवनातल्या अशा आठवणींना शब्दबद्ध करतील तेव्हा तेव्हा तो तो स्थानिक इतिहास अधिक माणूसकेंद्री आणि समाजकेंद्री होईल यात शंका नाही.
सुनील गोसावी यांच्या पुढील सामाजिक कार्याला आणि त्यांच्या लेखनाला मनापासून शुभेच्छा देऊन मी त्यांच्या आठवणींचा डोह या पुस्तकाचे तमाम वाचकांच्यावतीने हार्दिक स्वागत करतो.
मिलिंद कसबे
0 REVIEWS FOR पुस्तकाचे नाव : आठवणींचा डोह