शिर्डीचे श्री साईबाबा म्हणजे जगमान्य महान विभूती ! जगाच्या कल्याणाची इतकी तळमळ असलेला आणि भक्तांसाठी तेवढ्याच तीव्रतेने धावणारा असा संत विरळा ! जात, धर्म, पंथ, सीमा या सर्वापलीकडे मनुष्यत्वाची महती गाणारा माणूसच नव्हे तर किडा, मुगी, कुत्रे, मांजर, अशा सर्व पशुपक्षांतही समत्व पाहणारा आणि त्याची प्रचिती देणारा श्रेष्ठ योगी जीवन निर्मत्सरी, सुखी, समाधानी आनंदी आणि परोपकारी कसे जगावे याचे वास्तुनिष्ठ ज्ञान देताना श्रद्धा आणि सबुरीचा महामंत्र त्यांनी दिला! त्यांच्या अदभूत, गुढ, चमत्कारी आणि चमत्कारापलीकडील तत्वज्ञानी जीवनाचा रसाळ वेध घेणारी ही कादंबरी प्रा. विनोद गायकवाड़ यांनी लिहिली आहे. या कादंबरीचे इंग्रजी, हिंदी, कन्नड, तमिळ, गुजराती, आणि कोकणी भाषेत अनुवाद झालेल्या प्रत्येक भाषेत साई चे खपाचे उच्चांक निर्माण झाले आहेत. पुस्तकमार्कटने प्रकाशित केलेली ही इ-आवृत्तीही खपाचे नवे उद्यांक निर्माण करेल अशी आशा आहे.
0 REVIEWS FOR पुस्तकाचे नाव : साई