या संशोधन कार्यासाठी ज्यांनी मला प्रोत्साहन दिले, सहकार्य दिले, त्या सर्वांचे आभार मानणे, मी माझे कर्तव्य समजतो.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मराठी एम्. फिल्. पदवीसाठी “रंगनाथ पठारे यांच्या `रथ` या कादंबरीची सर्वांगीण चिकित्सा" ही शोध-प्रबंधिका पूर्ण करण्यासाठी व्यासंगी, कुशल, प्रेमळ मार्गदर्शक गुरुवर्य डॉ. द. दि. पुंडे यांचे बहुमोल मार्गदर्शन व प्रोत्साहन मिळाले. या लेखनाचे सर्व श्रेय मी त्यांनाच देऊ इच्छितो.
या विषयनिवडीमागे थोडा इतिहास आहे. डॉ. पुंडे, डॉ. कल्याण काळे व डॉ. सु. रा. चुनेकर यांनी मला सर्वप्रथम “रंगनाथ पठारे यांचे कादंबरीविश्व” असा अभ्यास करण्यास सुचविले. तो अभ्यास करताना प्रा. पठारे यांची प्रत्येक कादंबरी मौलिक व ताकदीची आहे, हे माझ्या लक्षात आले. त्यानंतर मी डॉ. पुंडे, डॉ. काळे व विद्यमान मराठी विभाग प्रमुख डॉ. कोत्तापल्ले यांच्याशी चर्चा करून माझा अभ्यासविषय `रथ` या कादंबरीपुरता मर्यादित करून घेतला.
0 REVIEWS FOR पुस्तकाचे नाव : रंगनाथ पठारे यांच्या रथ या कादंबरीची सर्वांगीण चिकित्सा,