कोकण मराठी साहित्य परिषदेने शहरातील कोनाकोप-यातील, सह्याद्रीच्या कुशीतील दुर्गम खेड्यातील, नवोदित साहित्यिकांचा शोध घेऊन त्यांना प्रोत्साहन दिले, उमेद दिली, प्रेरणा दिली. त्यांच्या स्फुर्तिला, प्रतिभेला चालना दिली. नवोदित साहित्यिकांना दिशा मिळाली. ते गतीने लिहू लागले. त्यापैकी कवी विनय होडे हे एक आहेत. त्यांचे वडील दिवंगत विलास होड हे एक परखड, आक्रमक ज्येष्ठ पत्रकार होते. तसेच ते तडफदार सामाजिक कार्यकर्ते होते. त्यांच्यातील गुणात्मक वारसा विनय होडे यांच्यात असला तरी आजकालच्या विचार स्वातंत्र्याची गळचेपी होते आहे, अशा परिस्थितीत ते दचकत लिहिताना दिसतात. साहित्यिकांनी प्रचलित सामाजिक, राजकीय व एकंदरीत समाजजीवनाशी निगडीत परिस्थितीवर भाष्य करून समाजप्रबोधन साधायला हवे. याची जाणीव त्यांना असली, तरी आजकाल पत्रकार, साहित्यिक यांच्यावर होणा-या अमानुष हल्यांमुळे ते आक्रमक लिहिण्याचे धाडस करत नाहीत असे जाणवते. मात्र कविता लिहिण्याचा छंद ते जोपासतात.
0 REVIEWS FOR पुस्तकाचे नाव : प्रतिबिंब