मी राजेश्वर वामनराव हेंद्रे. मूळचा सिव्हिल इंजिनिअर. सन २००८ मध्ये बावीस वर्षाच्या सेवेनंतर शासकीय नोकरीतून स्वेच्छा निवृत्ती घेऊन शैक्षणिक क्षेत्रामध्ये पाऊल ठेवले. त्यानंतर सन २००८ ते २०१८ या कालावधीत स्वतःला शिक्षित करत क्लासेस घेत होतो. याच काळात मी सहा पदव्युत्तर पदव्या आणि मानव संसाधन या विषयामध्ये डॉक्टरेट प्राप्त केली. स्टॅटिस्टिक्स आणि ऑपरेशन्स रिसर्च या विषयांचे क्लासेस मी घेत होतो. कंपन्यांमध्ये, विविध कॉलेजेस मध्ये शिकवीत होतो. सध्या, वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये गुणवत्ता आणि उत्पादकता या विषयामध्ये प्रकल्प मार्गदर्शन करतो. अनेक विद्यार्थ्याकडून (ज्यांचे की वय ३० ते ६० वर्ष आहे), पेपरमधून व स्वतःच्या कौटुंबिक अनुभवातून मला शालेय विद्यार्थ्यांना घडविणे, त्यांच्यामध्ये जीवनमूल्ये रुजविणे हे अत्यंत गरजेचे असल्याचे कळाले. यासाठी शाळेमध्ये लेक्चर्स घेणे, पालक असलेल्या माझ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणे हे कार्य चालूच होते. या प्रयत्नातूनच "अव्यक्त भावपत्रे" या पुस्तकाची निर्मिती झाली.
- डॉ. राजेश्वर हेंद्रे
0 REVIEWS FOR पुस्तकाचे नाव : अव्यक्त भावपत्रे