जीवन जगत असताना प्रत्येक व्यक्ती आपलं जगणं आपल्या परीने शोधत असते. तसाच मीही एक माणूस म्हणून माझं जगणं भोगणं आणि एकूणच अनुभवणं शोधत होतो. त्यातूनच जे गवसलं ते येईल तसं मांडण्याचा प्रयत्न मी केला आहे. यात माझं आगळं वेगळं असं गाव घोडेगाव ,माझं बालपण ,घरच्यांचा रोजचा संघर्ष ,यंत्रयुगाणे आमचा पारंपरिक व्यवसाय हातमाग बंद पडला .मजुरी करून जगण्याशिवाय पर्याय उरला नाही. वडिलांना लागलेला मटक्याचा नाद, त्यातून त्यांना लागलेले दारूचे व्यसन, दारू व्यसनाने कुटुंब ,नातेवाईक, गावाला वडिलांमळे झालेला त्रास, कधीकधी पोटासाठी होणारी उपासमार, मी स्वतः अनुभवलेली होती ,माझ्या शिक्षणासाठी आई -आजी व वडीलांची तळमळ मी स्वतः पाहिली आणि अनुभवली. अन मला करावा लागलेला शिक्षणासाठीचा संघर्ष, त्यातूनच माझं हे मटकेवाल्याची पोर या आत्मचरित्राची कोरोना काळात निर्मिती झाली.
0 REVIEWS FOR पुस्तकाचे नाव : मटक्यावाल्याचं पोर