डॉ. सुरेंद्र अर्जुन शिरसट हे इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेमध्ये मागील १४ वर्षा पासून इतिहास विषयाचे अध्यापक म्हणून कार्यरत आहेत. ई.स. २०२० साली त्यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने त्यांना विद्यावाचस्पती (Ph.D.) पदवी प्रदान केली होती. तसेच त्यांचे विद्यापीठ अनुदान आयोग व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या माध्यमातून तीन संशोधन प्रकल्पपूर्ण झालेले आहेत. गावांचा स्थानिक इतिहास विशेष अभ्यासाचा विषय असून ते मोडीलिपीचे जाणकार आहेत. मराठे कालीन अर्थव्यवस्थेवर त्यांचा विशेष अभ्यास आहे. त्याचबरोबर राज्य तसेच राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांचे २० हून अधिक शोधनिबंध प्रकाशित झालेले आहेत. त्यांनी राज्य तसेच राष्ट्रीय स्तरावरील संशोधन परिषदांचे आयोजन केलेले आहे. ते नाशिक येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संस्थेच्या इतिहास अभ्यास मंडळावर ते सदस्य म्हणून कार्यरत आहे
0 REVIEWS FOR पुस्तकाचे नाव : मराठेकालीन पुणे प्रांताची अर्थव्यवस्था (इ.१७०७ ते १८०८)