`द सक्सेस ऑफ लक्ष्मीपुत्र` हे पुणे जिल्यात चाकण येथील सुपरिचित उदयोजक श्री. भरतशेठ एकनाथ कानपिळे यांचे आत्मचरित्र आत्मकथन अनेकांसाठी मार्गदर्शक ठरावे असे आहे.
श्री. भरतशेठ, त्यांचे वडील, एकनाथ कानपिळे आणि त्यांचे आजोबा कै. राणोजी कानपिळे या तिन पिढ्यांचा कष्टाचा इतिहास या पुस्तकात आहे. पिंपरीच्या भाजी मंडईत सतरा वर्ष भाजीपाला विकणारा एक तरुण आपल्या वाडवडिलांच्या आर्शिवादानं आणि सचोटी, प्रामाणिकपणा आणि मेहनतीच्या जोरावर आज एक यशस्वी उदयोजक बनतो. चाकणच्या एमआयडीसीत आज सतरा एकरचा मालक बनतो, आई लक्ष्मीच्या आणि जयमातादी वैष्णवदेवीच्या आर्शिवादानं जीवनात सक्सेस होतो. हा सगळा यशस्वी जीवन प्रवास या पुस्तकात आहे.
श्री. भरतशेठ कानपिळे यांचे उत्साही आणि प्रेमळ व्यक्तिमत्व अनेकांसाठी आधारस्तंभ आहे. शिस्तीचा कुटुंबप्रमुख, सचोटीचा व्यापारी, मुसद्दी उदयोजक आणि माणूसकी जपणारा सदाबहार माणूस म्हणून त्यांची ओळख आहे. छंद जपणारा, नव्यानव्या गोष्टी शिकणारा, मैत्रीला जागणारा आणि गर्वापलिकडे माणूसपण जपणारा माणूस म्हणून त्यांची ओळख अनेकांच्या काळजात आहे.
या पुस्तकाच्या रुपाने एका सत्शील, विवेकी आणि यशस्वी माणसाचा जीवनप्रवास उद्याच्या पिढीसाठी नक्कीच दिपस्तंभ ठरेल असे वाटते.
- डॉ. मिलिंद कसबे
0 REVIEWS FOR पुस्तकाचे नाव : द सक्सेस ऑफ लक्ष्मीपुत्र