पुस्तकात, बाबू नावाचे धनगर गृहस्थ व त्याच्या कुटुंबाला भटकं जीवन जगताना भारतीय समाजाकडून मिळणारी वागणूक आणि देवाने त्यांच्या भाळी लिहिलेलं जीवन रेखाटण्याचा मी प्रयत्न केला आहे. लिहताना आम्हा धनगरांचं एन जीवन कशा रीतीने देशापासून दुरावलेल्या अवस्थेत आम्ही काढतो, शासकीय सवलती आम्हाला कशा प्रकारे मिळतात किंवा आमच्या अनपड प्रवृत्तीच्या कारणाने, आम्ही लोक त्या कशा नाकारतो. आम्हा लोकांची होणारी आवळ, आम्हा लोकांवर होणारा काळाचा घाला, जीवन जगत असताना येणाऱ्या हजारो समस्या यांचे वर्णन केले आहे. माय-लेकी, सुना, बाळा यांच्यावर येणाऱ्या प्रसंगाचे चित्रण केले आहे. जीवन कंठत असताना लेकरा बाळाचा खेळखंडोबा कसा होतो याचे वास्तव मांडले आहे. मेंढपाळांना आपल्या व्यवसायासाठी भटकीचे किती चटके सोसावे लागतात ? आम्हास जीवनाच्या प्रत्येक जीवनावश्यक गोष्टी मिळवण्यासाठी किती परिश्रम घ्यावे लागते ? तसेच भारतीय समाजापासून दुरावल्याने आम्हावरती कोणते दुष्परिणाम होतात किंवा झाले हे मला आग्रहाने सांगावेसे वाटते. खरे तर या लिखाणातून आमचं संपूर्ण ऐरणात भटकण्याच पहुडलेलं जीवन येथे रेखाटण्याचा प्रयत्न मी केला आहे. आणि ही एका व्यक्तिची गोष्ट नसून समस्त समाजाची कहाणी आहे. हे सांगणे वावगे ठरणार नाही.
- अभिजित नजन (लेखक)
0 REVIEWS FOR पुस्तकाचे नाव : भटकं बिऱ्हाड