जगाच्या पाठीवर धनगर समाजाचे आसील काय आहे हे मांडण्यासाठी सदर पुस्तकाचे संकलन आणि संपादन मी केले आहे.
डॉ. सुधीर तारे हे जगविख्यात लेखक आहेत. धनगर समाजाच्या उन्नतीसाठी त्यांनी जे ज्ञानप्रसाराचे कार्य केले आहे त्याला तोड नाही. एवढ्या महान माणसाचे शिष्यत्व जगणे ही ही माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. म्हणून गुरुवर्य व आदरणीय डॉ. सुधीर तारे यांच्या कष्टातून साकारलेले हे लेखन मी संकलीत केले आहे
या पुस्तकात मेंढपाळ आणि मेंढ्याचे जीवन किती वैभवसंपन्न आहे हे मला सुचीत करावेसे वाटते. महाराष्ट्रातील मेंढपाळ, भटका समाज या लेखनातून मोठी प्रेरणा घेऊन संघटीत होईल अशी मला आशा आहे.
जगाच्या पाठीवरच्या विविध देशांत शेती आणि शेतीपूरक उद्योगांचीही माहीती या पुस्तकात मांडली आहे. याशिवाय विविध देशांतले आश्चर्यकारक स्थळे आणि त्यागच्या रंजक कहाण्याही डॉ. तारे यांनी मांडल्या आहेत.
मराठी माणसासाठी ही सर्व माहिती नवी आणि प्रेरणा देणारी आहे. या पुस्तकाचे टंकलेखन करून ईबुक स्वरुपात प्रकाशित करण्याची मोठी जबाबदारी पुस्तक मार्केट या ऑनलाईन पोर्टलने स्वीकारली व सदर इबुक डॉ. तारे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने २८/०९/२०२२ रोजी प्रकाशित केले यासाठी पुस्तक मार्केटच्या सर्व टिमचे मनापासून आभार. तसेच हे पुस्तक वाचकांपर्यंत पोहचवण्यासाठी व त्याचे आवश्यक ते संपादन सहकार्य व अर्थसहाय्य करण्याची जबाबदारी माझे संपादक सहकारी यांनी घेतली त्यांचे मनापासून आभार.
- डॉ. पै. बाळासाहेब लक्ष्मण मंगसुळे
0 REVIEWS FOR पुस्तकाचे नाव : जगाच्या पाठीवरचा धनगर समाज