निवडुंग ते बोधीवृक्ष हे आत्मकथन आहे दत्तात्रय गुंडेराव बनसोडे (गुरुजी) यांचे... ध्येयनिष्ठ शिक्षक, मुख्याध्यापक, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आणि लोकसभेचे उमेदवार अशा जीवनप्रवासाचे, येणेगूर व्हाया सोलापूर ते गंगापूर या जगण्याचे. आहे त्या स्थितीत सकारात्मक-विधायक धडपड हे या कहाणीचे सूत्र आहे.आपल्या भोवतीच्या समाज-संस्कृतीमध्ये आपल्याच अस्तित्वाचा, आत्मसन्मानाचा आणि त्यासाठी केलेल्या संघर्षाचा शोध हा या आत्मकथनाचा परीघ आहे. समूहकेंद्री जाणिवेने समाजातील जातीय स्तर, एकमेकांकडे पाहण्याचे पूर्वग्रहांसह असणारे दृष्टिकोन यातून आले आहेत. विविध संस्था-संघटनांशी कर्मचारी- अधिकाऱ्यांशी पक्ष- पक्षनेत्यांशी, लोकांशी, गाव-शहरांशी आलेला संबंध नितळ मनाने यातून प्रवाहित झाला आहे. सहवासात आलेल्यांचे संगत-विसंगत वर्तन, अंतर्विरोधी आचरण, मूल्यांची भाषा करणाऱ्यांचे दंभ आणि त्यातून घडणारे समाज-संस्कृतीचे दर्शन समाजवास्तव अधोरेखित करणारे आहे. मात्र वास्तव मांडताना द्वेष-विद्वेष नाही, राग - संताप नाही. विवेकनिष्ठ अन् मूल्यनिष्ठ समतोल भूमिका मात्र आहे. वर्तमान समाजाचे वास्तव आणि इतिहास यांना दिलेले हे अर्थपूर्ण अक्षररूप आहे.
- प्रा. डॉ. प्रल्हाद जी. लुलेकर,
0 REVIEWS FOR पुस्तकाचे नाव : निवडूंग ते बोधीवृक्ष