पुस्तकाचे नाव : मंग अंधार पेटला
- Category: Literature
- Author: प्रा. विजयकुमार गवई
- Publisher: Pustakmarket
- Copyright By: निर्मला विजय गवई
- ISBN No.: 978-93-91250-87-4
मराठी साहित्य संमेलने, दलित, विद्रोही, प्रबोधनकारी साहित्य संमेलने संपूर्ण भारतभर जनजागरण अभियानासाठी मी फिरलो. अनेक शाळा, महाविद्यालये, दलित नाट्य संमेलने, यात सहभागी झालो, वावरलो. `मंग अंधार पेटला` या माझ्या पहिल्याच काव्यसंग्रहातील ‘माव` आणि `घरघरते व जात` या काव्याने खऱ्या अर्थाने मला ओखळ दिली. महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेरील रसिकांनी माझ्या सादरीकरणाला प्रतिसाद दिला. अनेक दिग्गजांनी माझी माय ऐकली. त्यात वसंत बापट, पू.ल. देशपांडे, नारायण सुर्वे, केशव मेश्राम, संगीतकार राम कदम, बाळ पळसुले अशी नावे घेता येतील. सुरेश भट यांनी मला महदनाथ मंगेशकर कडे नेले आणि माझ्या रचना ऐकल्यात. कविवर्य कुसुमाग्रज यांनीही ऐकले. अभिनेत्री ललिता पवार, लिला गांधी, लोककवी वामनदादा कर्डक, अभिनेत्री मंधू कांबीकर, प्रेमा किरण, राजा गोसावी, डॉ. सुभाष गवई, यशवंत दत्त, चित्तरंजन कोल्हटकर, भाऊ पंचभाई, यशवंत मानखेडकर, डॉ. निलकांत कुलसंगे, प्रमोद वाळके या अशा जाणत्यांनी भरभरुन प्रतिसाद दिला. शहरात आणि ग्रामीण भागातही `माय` घराघरात पोहोचली. - विजयकुमार गवई