एखाद्या अपूर्वसांस्कृतिक देखाव्याची-फिनॉमेननची पहाटप्रभा पाहण्याचे भाग्य इतिहासाची नियती काही जणांच्या भाळावर लिहून जाते. मराठी दलित साहित्याचा अवतार असाच एक अपूर्व सांस्कृतिक देखावा आहे. त्याचा साक्षी होण्याचे भाग्य मला लाभले, याचा मला विशेष आनंद वाटतो. हा देखावा, त्याचे रागरंग, त्याची अपूर्वता आदिना सर्वकष पणे न्याहाळण्याची कुवत अर्थातच माझ्याजवळ नाही पण एक प्रकारच्या उत्साहाने, आस्थेने व मानवी मीमांसक बुद्धीची मर्यादा ओळखून त्या आगळया देखाव्याचे जे जे रंगरूप मला जाणवले, ते ते नम्रपणे वाचकांना सादर करण्याचा मी प्रयत्न केला आहे. एकोणविसशे साठीच्या दशकात पृथगात्म रूप धारण करू लागलेल्या नव्या दलित साहित्याच्या वाचनातून व चर्चेतून वेळोवेळी जे जे प्रश्न मनाला तीव्रतेने जाणवत गेले, ते ते प्रश्न नीटपणे समजावून घेण्या-देण्यासाठी हे लेखन केलेले आहे. त्यामुळे या लेखनात नियोजनपूर्वक आखलेला पद्धतशीर अभ्यास आढळणार नाही त्यात प्रबंधाची व्याप्ती लेखाची कळाही नाही. दलित साहित्य, ते निर्माण करणारे सर्जनशील मन आणि त्याचा अंतरबाह्य यांच्यात प्रकटपणे वा प्रच्छन्नपणे जाणवलेली प्रयोजन-प्रेरणाची प्रवृत्तीची अडचणी-अडथळ्यांची, सिद्धी साधनांची जी जी वैशिष्ट्ये आहेत, त्यांचा शोधबोध करून घेण्याचा माझा प्रयत्न आहे.
पुस्तकातुन...
0 REVIEWS FOR पुस्तकाचे नाव : निळी पहाट