श्री. जावीर यांचा हा कथासंग्रह जवळ जवळ सतरा कथांनी व्यापलेला आहे. `शिवारधन`, `अब्रु` ‘मुक्या वेदना’, ‘मजबूरी’ अशा सकस कथा या संग्रहात आहेत. अब्रु ही दलितांवरील होणारे अन्याय, अत्याचार दर्शवणारी कथा आहे. फटकरी ही कथा ऊसतोड कामगारांचे जीवन व्यक्त करते. शेवटी तो गेलाच ही कथा एड्स रोगाने ग्रस्त व्यक्तीचे जीवन चित्रीत करते. सासरची वाट ही कथा नवऱ्याच्या दारूच्या व्यसनाचे बायकोच्या जीवनावर झालेले दुष्परिणाम दर्शवते.
लेखकाची त्यांच्या विचारविश्वाशी बांधिलकी कशी असते हे जावीर यांचे लेखन वाचून कळते. लेखनातून समाज सुटला की लेखन वांझोटे होते हे जावीरांना ठाऊक आहे. म्हणून समाज विशेषतः ग्रामीण जीवन, संस्कृती आणि निसर्ग हे त्यांच्या लेखनातून त्यांनी सुटू दिलेले नाही.
- मिलिंद कसबे.
0 REVIEWS FOR पुस्तकाचे नाव : गुलामी जीणं (कथासंग्रह)