दोन ओळींचा बंध असलेली रचना गझल मानली जाते. गझल ही रचनेच्या व सादरीकरणाच्या अंगाने ही लक्षात घेतली जाते. गझलमध्ये अंत्य व उपांत्य यमकांचा विचार केला जातो. मात्रा मोजून तंत्रदृष्ट्या गझल ठिकठाक करण्याचा प्रयत्न येथे चालू असतो. गझल मध्ये उपरोध खटकेबाजपणा, दाद घेण्याची जागा व ताकद महत्त्वाची मानली जाते. मोठ्या प्रमाणात प्रेमावर गझल लिहिली गेलेली आहे. आधुनिक गझल मात्र सामाजिक जाणिवेची गझल आहे. आंबेडकरी गझल ही सुध्दा सामाजिक गझल मानली जाते. आंबेडकरी गझलेत आंबेडकरी विचार महत्वाचा मानला जातो. आंबेडकरी विचाराला गझलचा आकार दिला की ती आंबेडकरी गझल होते. कोणतीही गझल परिवर्तनवादी व मानवतावादी असावी. कधी कधी तशी असतेही पण ती विज्ञानवादी किंवा निरिश्वरवादी आणि जातीविरोधी, विषमताविरोधी असतेच असे नाही. गझलेने आध्यात्मविचार, परंपरावादीविचार स्वीकारला की तिची भाषा गौरवपर, दैववादी, पाप-पुण्यवादी बनते येथेच आंबेडकरी गझल वेगळी ठरते.
0 REVIEWS FOR पुस्तकाचे नाव : अग्नी तेवत ठेवणारी आंबेडकरी गझल