Book Name : Dalit Rajkaran Ani Dalit Sahitya
- Category: Literature
- Author: उत्तम कांबळे
- Publisher: Pustak Market Publication
- Copyright By: उत्तम कांबळे
- ISBN No.: 978-93-91250-38-6
₹10
₹20
बाबासाहेबांच्या स्वप्नातील समाज तयार करण्याचे कष्ट कोणाही नेत्याने घेतले नाहीत. कारण ते त्यांच्या स्वार्थाच्या आड आले असते, अंगलट आले असते. समाजाला नेत्याची गरज असते की नेत्याला समाजाची गरज असते, अशा एका सूत्रापर्यंत आज समाज नेण्यात आला. कोणीही लक्षात घेतले नाही की जय भीमचा नारा जेथून येतो, तिकडे समाज जाण्याचा प्रयत्न करतो. नारा देणाऱ्याच्या राजकारणाचा समाज विचार करीत नाही. राजकारणात आपण जात वापरतो आणि बाहेर धम्माची भाषा करतो, हे दुभंगलेपण कधी संपणार हा त्याचाही प्रश्न आहे.