संग्रहाच्या मुखपृष्ठा पासूनच कविता वाचकाला आपलेसे करते. तरलता आणि तात्विकता हा कवितेचा गूणधर्म असल्याने स्त्रीच्या अंतर्मनाच्या गुढतेचं आकलन व्हायला कविता अधिक जवळीक शोधते. आणि कवितेची उमज अन उकल आपलीसी होते. वाचक रवी असो की पुरूष कविता त्यांचीच होते.
तसं पाहाता स्त्रीला अंधाराची समज निसर्गतःच आहे. म्हणूनच आदिम काळात ती टोळी प्रमुख असायची अन आताच्या काळात संसार प्रमुख आहे. मनाच्या तळातल्या अंधारात ती सुखसंवेदना जगण्याच्या वेगवेगळ्या रूपात आविष्कृत करते. आणि शब्द चांदणे फुलं होवून कागदावर अलगद उतरतात. त्याच ह्या उजेडी कविता. वाचकांना अंतर्मुख करणाऱ्या कवयित्री चित्रकार असल्याने कवितेला चित्रमयी आकार आहे. पत्येक कवितेला स्वतःचा असा संदर्भाचा परिघ आहे.
ह्या परिधाच्या वलयात वाचक स्वतःलाही अंतरंगाह शोधू पाहतो. हीच किमया सान्या मनस्वी कवितांची आहे.
-श्रीधर अंभोरे
(मलपृष्ठावरून)
0 REVIEWS FOR पुस्तकाचे नाव : संदर्भ