कोलदांडा या नव्या काव्यसंग्रहातील कविता असून भान लाभलेले एकाकी अस्वस्थपण घेवूनच वावरतात. गावकुसाखालचा अश्रू महापूर होवू पाहतोय अशा शब्दात ते अस्पृश्यतेचा अन्याय दूर करु पाहणारा हुंकार मांडतात. व्हलर समाजाच्या अस्मितेचा शोध घेणारे होलीया साहित्य स्वतंत्रपणे लिहण्याचे भान ठेवूनही ते कविता लिहतात. व्हलर भटक्याचे मनोगत तमाशाची नांदी माझी आई फिरस्ता माझं जीवन पोटची आग उपेक्षा भटके माजं प्वॉर बोडका धुळा डवरी अशा कविता या दृष्टीने पाहता येतात. भटक्यांची संस्कृती मानसिकता जीवनशैली अशा कवितांच्यामधून ते पुढे आणतात. एकविसाव्या शतकात जगावे कसे ? या प्रश्नाचा कोलदांडा कविच्या मनाला बसला आहे तो निघता निघत नाही. जागतिकीकरण उदारीकरण यांत्रिकीकरण खाजगीकरण विशेषीकरण यांचे अगदी महाराष्ट्रातील खास सांस्कृतिक साम्राज्यवादाच्या वरवंट्याखाली दडपले जाणारे दुसऱ्या आणि तिसऱ्या जगातले समाजजीवन सरजामी भांडवली पुरुषसत्ताक जाती व पध्दतेच्या ओझ्याने दडपलेले भटक्या विमुक्ताचे जीवन याच्या कल्पनेने कोलदांड्यात अडकलेले कविचे मन वाचकालाही कोलदांडा घालते हे या लेखनाचे यश आहे.
- प्रा. डॉ. बाबुराव गुरव
0 REVIEWS FOR पुस्तकाचे नाव : कोलदांडा (सामाजिक काव्यसंग्रह)