श्री. ए. आर. सुतळे (बी. ए.) यांनी लिहिलेले `दलितांचा देव` हे पुस्तक वाचल्यानें अस्पृश्य समाजाच्या लढ्याचे धावते दर्शन होते. त्याचप्रमाणे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अस्पृश्य समाजाची सर्वांगिण उन्नती करण्यासाठी, हिंदुसमाजाची सुधारणा करण्यासाठी व देशाचा नावलौकिक होईल, अशा महान कृतीची ही आठवण ध्यानांत येते. हे पुस्तक वाचकास मुख्यता अस्पृश्य वर्गास व सर्व जनतेस मोठे उपयुक्त होईल. या पुस्तकांतील खालील नमूद केलेली प्रकरणे महत्वाची व वाचनीय अशी आहेत. प्रकरण १ हिंदुसमाजांतील अस्पृश्यांचे स्थान. प्र. २ मानवीधर्म निर्माण करणारा सवाई मनु. प्र. ४ जातीयता नष्ट करणारा महान क्रांतीवीर. प्र. ५ माणसुकीसाठी लढा उभविणारा रणझुंजार इ. प्रकरणे महत्वाची आहेत. श्री. सुतळे यांचे हे पहिलेच पुष्प व पहिलाच प्रयत्न या दृष्टीने हे पुस्तक चांगले आहे. अस्पृश-समाजांतील प्रत्येक व्यक्तीने हे पुस्तक संग्रही ठेवावे, असे मला वाटते.
P. N. Rajabhoj.
सेक्रेटरी अ. भा. द. फे. पुणे.
0 REVIEWS FOR पुस्तकाचे नाव : दलितांचा देव