“उजेडाचे नवे चारित्र्य” हा माझा दुसरा कवितासंग्रह आणि ई - बुक स्वरूपात प्रकाशित होणारा पहिलाच कवितासंग्रह आहे. साधारणतः या कवितासंग्रहातील कविता निर्मितीचा कालखंड हा १९९१ ते २०१६ पर्यंतचा प्रदीर्घ असा काळ आहे. या कालखंडात कुटुंब, समाज, देश, राजकारण, नैसर्गिक आणि मानव निर्मित आपत्ती, अनेक स्वरूपाचे विचारप्रवाह आणि त्याचे समाज, साहित्य आणि संस्कृतीवर उमटलेले पडसाद इ. मुळे एका संवेदनशील मनावर बसलेले हादरे, भावनिक पातळीवरील झालेले आघात आणि त्याचे व्यक्तीच्या संवेदनशीलतेवर होणारे परिणाम साधारणतः कवितेचे विषय होतात. कविता माणसाला जिवंत ठेवण्याचे काम करते किंबहुना माणसाच्या जिवंततेचे प्रतीक म्हणजे कविता असते. आपल्या भावनांना, संवेदनांना, विचारांना आकार देण्याचे आणि अनुभवाच्या प्रकटीकरणाचे साधन कविता असते. कवी आणि त्याच्या कविता यांचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष संबंध असतो. या संबंधानुसारच कवितांचा चेहरा- मोहरा असतो. या सर्वांचा प्रत्यय आपल्याला कवितेतून येत असतो.
0 REVIEWS FOR पुस्तकाचे नाव : उजेडाचे नवे चारित्र्य