सवलतीचा चतकोर तुकडा खाऊन सुस्तावलेल्या संसदेत फालतू कविता म्हणणाऱ्या वाघांची, पँथरच्या रक्ताची डी.एन.ए. टेस्ट करण्याची भाषा कवी करतो. ही खरंच बाबासाहेब आंबेडकरांची लेकरं आहेत का नाहीत? अशा प्रकारचे प्रश्न कवी निर्भिडपणे विचारतो. आंबेडकरी प्रेरणेची कविता किती पराकोटीचे आत्मपरीक्षण, आत्मटीका करू लागली आहे. याचे निशांत गुरू यांची कविता महत्त्वाचे उदाहरण आहे.निशांत गुरू यांनी मराठी साहित्यात वाघिणीच्या दूधाने पंचशीलांची पेरणी केली आहे. पेरणी मानवी मुल्यांची समतेची स्वातंत्र्याची पेरणी केल्याशिवाय रूजवण होत नाही. रूजवण झाल्याशिवाय रोपं उगवत नाहीत. रोपं उगवल्याशिवाय पीक हाती येत नाही. हा शेती शास्त्राचा सार्वत्रिक नियम आहे. हा नियम कुठल्याही समाजाला तंतोतंत लागू पडतो. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी म्हटले आहे. एका वर्षाची बिदागी हवी असेल तर धान्य पेरा, शंभर वर्षाची बिदागी हवी असेल तर माणसं पेरा आणि दहा हजार वर्षाची बिदागी हवी असेल तर विचार पेरा....(प्रस्तावनेतून)
0 REVIEWS FOR पुस्तकाचे नाव : वाघिणीचं दूध (कवितासंग्रह)