आयुष्यात अनेकांनी केलेल्या उपकारांचं ओझं माझ्या डोक्यावर आहे. वस्तुतः या अशा ओझ्यामुळेच आपले पाय जमिनीवर राहतात. पण चालतांना हे ओझं थोड्या वेळासाठी का होईना झाडाखाली उतरवावं, सावलीला थांबावं, थोडं मागे वळून पाहावं आणि गतकाळाचा हा `सरवा` आपल्यासमोर उलगडावा यासाठी मी हा थोडासा खटाटोप केला आहे.
`खरंतर हा `सरखा` मनात कधीपासूनच रुतून बसला होता, अंत:करणात घर करून राहिला होता. सारखा खुणावत होता. म्हणत होता, `मला वेचणार नाहीस, गोळा करणार नाहीस? विसरलास का, मी तुझ्या कितीतरी सांजा भागवल्या आहेत, तुला जगवलं आहे.`
हा `सरवा` करतांना काही `चुकार` शेंगा माझ्या नजरेतून सुटल्या असतील, काही `नक्काऱ्या` शेंगा मीच सोडून दिल्या असतील, काही टुक्कार `गोसाई` धांड्यांना मी हातही लावला नसेल, आणि काही `भुईचं देणं` म्हणून मी भुईतच राहू दिला असेल...
किसन वराडे
0 REVIEWS FOR पुस्तकाचे नाव : सरवा