मला जर कोणी कॉलेजच्या वेळी शिकत असताना म्हटलं असतं की तुषार तू भविष्यात कादंबरी लिहिशील असं ऐकताच त्याने मला उपहासात्मक टोमणा मारला म्हणून मी कदाचित त्याला चार शब्द सुनावले असते, ही कादंबरी लिहिण्याची प्रेरणा मला रस्त्यावरून डोंबारी खेळ करणारे तसेच फिरस्ती आणि भटकंती करणाऱ्या जमातींना पाहून मिळाली मी स्वतः एका छोट्याशा झोपडपट्टीतून जीवन जगलेलं असुन मी या जमातींविषयी प्रचंड संवेदनशील आहे. म्हणूनच शेवटी मी यावर लिहिण्याचा निश्चय केला. त्या जमातींचा आर्थिक व लैंगिक शोषण, शैक्षणिक अभाव, विवेकाचा तुटवडा इत्यादी गोष्टी थोडक्यात मांडण मला खरं तर अवघड वाटत होतं, पण मी तसं मांडण्याचा छोटासा प्रयत्न केलेला आहे. चंद्याची ही गोष्ट मी सिनेमा बनविण्याच्या उद्देशाने लिहिली होती पण ही गोष्ट मला साहित्य रुपात प्रकटावी असं वाटलं म्हणून मी त्याचं लिखाण थोडाफार पटकथे सारखंच लिहिले आहे. मला आशा आहे की ही शैली वाचकांना भावेल व हे नाविन्य वाचक स्वीकारतील. कधीकधी सारी आणि चंद्या या दोन्ही पात्रांची मानसिक घुसमट मांडत असताना मला बाल मानसशास्त्र, समाजशास्त्र, गाव गाड्यातील परिस्थितीचा थोडाफार कानोसा घ्यावा लागला आहे, आणि अभ्यास करूनच मला ही छोटीशी कादंबरी लिहावी लागली आहे. यातील सामाजिक प्रसंग हे अतिसंवेदनशील आहेत. त्याची हाताळणी करताना विशिष्ट ताणतणावातून जावं लागलं होतं हे सांगण्याचा मला मोह आवरता आला नाही. तसेच आणखी एक बाब अशी आहे की, चंद्या ही गोष्ट शिक्षणापासून वंचित असणाऱ्या, अंधश्रद्धाळू आणि पारंपारिक विचारसरणीच्या लोकांची असल्याकारणाने त्यांचे संस्कार व वर्तणूक यामध्ये आताच्या तुलनेत प्रचंड विरोधाभास आहे.
0 REVIEWS FOR पुस्तकाचे नाव : चंद्या