आधुनिक काळातील अनुकूल-प्रतिकूल घटनांना शब्दबद्ध करणाऱ्या कविता या काव्यसंग्रहात आहेत. यापूर्वी त्यांच्या बहुतेक कवितांचा आस्वाद रसिकवाचक म्हणून मी घेतलेला आहे. तथागत बुद्ध, कबीर या महामानवांसह फुले, शाहू, आंबेडकर यांच्या उदात्त विचारांचा वसा आणि वारसा या कवितासंग्रहाने संपन्न केला आहे. त्याचबरोबर या कवितासंग्रहात सध्याच्या सामाजिक आणि राजकीय परिस्थितीवर नेमके भाष्य मांडण्याचा प्रयत्न कवीने केला आहे. सरळसोप्या शब्दांसह साधी मांडणी आणि अलंकारिक भाषा, वृत्त-अलंकार यांचं अवडंबर न माजवता ही कविता सर्वधर्मसमभाव, माणुसकी, निसर्गाची जपवणूक, प्रेम आणि जिव्हाळ्याचा सन्मान करत अन्याय-अत्याचारावर तुटून पडते, देशभक्तीची जाणीव करून देते. या संग्रहाच्या निमित्ताने मराठी कवितेत एका नव्या विचारशील कवीची आश्वासक अशी भर पडत आहे. मानव्याची सकारात्मक कविता लिहिणाऱ्या या कवीला काव्यदिंडीतील वारकरी म्हणून मनस्वी सलाम करतो.
- रवींद्र मालुंजकर
0 REVIEWS FOR पुस्तकाचे नाव : ह्या ग्लोबल युगात