या पुस्तकात काही महत्त्वाचे प्रश्न पुन्हा चर्चेत आणण्याचा प्रयत्न आहे. विशेषतः जागतिकीकरणाच्या वास्तवात प्रागतिक चळवळींपुढे उभ्या राहिलेल्या आव्हानांना कसे तोंड देता येईल? सांस्कृतिक संघर्ष चहुबाजूंनी वाढत असताना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या मुळ विचारांना कसे आचरणात आणता येईल? असे अनेक प्रश्न मांडण्याचा प्रयत्न केला आहे. अर्थात देशीवाद, सांस्कृतिक साम्राज्यवाद, जागतिकीकरण, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे धर्मकेंद्रित राजकारण, बाबासाहेबांचा शिक्षणविषयी दृष्टीकोन अशा अनेक प्रश्नांची विस्तृतपणे मांडणी आजपर्यंत ज्या अनेक लेखक, विचारावंतांनी करून ठेवली आहे त्या मांडणीचा आधार घेऊन हे पुस्तक पुढे जाते. यात वेगवेगळ्या विचारवंतांनी मांडलेली मते उद्घृत करून कार्यकर्त्यांसाठी काहीएक सूत्र देण्याचा माझा प्रयत्न आहे. कदाचित यामुळे या पुस्तकात अनेकदा संदर्भाची रेलचेल दिसेल, परंतू तेही आवश्यक आहेत असे वाटते. या पुस्तकाच्या अनेक मर्यादा स्वीकारून यातील लेखन आजच्या सांस्कृतिक संघर्षावर प्रकाश टाकेल अशी आशा वाटते...(पुस्तकातून)
0 REVIEWS FOR पुस्तकाचे नाव : आंबेडकरवादापुढील नवी आव्हाने