पुस्तकाचे नाव : जोहार मायबाप
- Category: Literature
- Author: संजय दवणे
- Publisher: Pustakmarket
- Copyright By: संजय दवणे
- ISBN No.: 978-81-978490-0-8
`जोहार माय बाप...!` ही छोटेखानी कादंबरी वाचकांच्या सेवेत सादर करताना हर्ष वाटतो. यापूर्वी `हाक` आणि `दोनभारत` हे दोन कवितासंग्रह प्रकाशित झालेले आहेत. वाचक हो...! `जोहार माय बाप...!` बद्दल सांगायचे झाल्यास पार मागे जावे लागेल. १९८६ ला मी मॅट्रीक पास झाल्यावर ही कादंबरी लिहिण्यास सुरुवात केली. कादंबरी लिहिण्याचे कोणतेच तंत्र माहिती नसताना मी लिहू लागलो. तेव्हा मी अकोला जिल्ह्यातील पाटसूल रेल्वेस्टेशनच्या पुढे ३-४ किलोमिटरवर असलेल्या खारानाला रेल्वे कॉर्टर येथे राहत होतो. `खारानाला` ही एक खाऱ्या पाण्याची नदी आणि त्या नदीच्या लगतच हे आठ रेल्वे कॉर्टर असल्याने त्या रेल्वे कॉर्टरला खारानाला हे नाव पडले. तेथून पाटसूल, देवरी, आलेवाडी, मरोडा, दिनोका ही गावे ५ ते ६ कि.मी. अंतरावर होती. आम्ही प्रथम पाटसूल या गावी प्राथमिक शाळेत पायी जात असू. १ ली ते ७ वी पर्यंतचे शिक्षण पाटसूल या गावी झाले आणि नंतर ८ वी ते १० वी पर्यंत देवरी या गावी. १० वी नंतर तालुक्याचे ठिकाण असलेल्या अकोट या छोट्या शहरात शिक्षण झाले. -संजय दवणे