पुस्तकाचे नाव : गंध सोनचाफी
- Category: Literature
- Author: गौतम कांबळे
- Publisher: Pustakmarket
- Copyright By: शैलजा गौतम कांबळे
- ISBN No.: 978-93-92466-96-0
₹70
₹80
झाडे उगाच का टाकती उसासे असा सदैव अनुत्तरित राहणारा एक शाश्वत प्रश्न विचारणारी गौतम कांबळे यांची ही कविता सौंदर्यलक्षी आहे हा या कवितेचा सहज जाणवणारा, प्रथमदर्शनी भावणारा असा गुणविशेष आहे. सांप्रतची एकूण कविता जशी बरीचशी आवाजी स्वरूपाची आणि एकूणच जीवनविषयक तक्रारी मांडणारी अशी आभासी कविता होऊन गेलेली आहे त्या कवितेपासून ही कविता अलिप्त आहे, हा तिचा अपवादात्मक वाटावा असा लक्षणीय गुण आहे. आणि अशा कवितेच्या अभिव्यक्तीकरिता ज्या शब्दकळेची आवश्यकता आहे ती शब्दकळा गौतम कांबळे यांना गवसलेली आहे. त्यामुळे या कवितेतून प्रकट होणाऱ्या जीवन जाणीवा मला मोलाच्या वाटतात. अशा काव्यलेखनातूनच कवीला स्वतःची वाट सापडत असते. सोनचाफ्याचा हा गंध म्हणूनच दरवळत राहणारा आहे असे वाटते आणि तेच त्याचे बलस्थान आहे हे निश्चित. प्रा. वैजनाथ महाजन ज्येष्ठ समीक्षक