अंगुलीमालाची कथा
पदीलीन तथागता अनुसरीतो त्या पथा ।
अंगुलीमालाची मी सांगतो कथा ।।
कथा घडली ही कोसल नगरीत
तयाचा राजा तो प्रसेनजीत
शक्तीशाली जंबूद्विपात
तयाचा डंका चहुमुलखात
प्रजा त्या नगरीची आनंदात
राजाच्या पदरी राजपुरोहीत
विद्वान गार्गी अग्र पंडित
पारंगत सर्व शास्त्रांत
त्या पदाची पात्रता । जतन करी सर्वथा
अंगुलीमालाची मी सांगतो कथा