या कथासंग्रहात एकूण ११ कथा आहेत. शिर्षक कथा " प्रगती पुस्तक” एका कथेचे नाव आहे. यातील अनेक कथा शिक्षणासाठी धडपडणाऱ्या मुला-मुलींच्या जीवनसंघर्षावर आधारित आहेत. माझ्या घरात साहित्याचा वारसा नाही. पण भोवताली घडणाऱ्या बऱ्यावाईट घटनाचे पडसाद मनावर होत राहतात. माझे मन अस्वस्थ झाल्यावर साहित्यिक कथा कादंबरी-कविता- आत्मचरित्र यासारख्या साहित्यिक लेखनाची वाट धरली. वाचलेल्या ऐकलेल्या, पाहिलेल्या अथवा अनुभवलेल्या घटना प्रसंगातून कथाबिज बहरत आल्या आहेत. माझे हळवे मन, जीवनातील सुखदुःख, संकटे झेलीत राहिल्याने मनाच्या सागरात आलेली भरती-ओहोटीच्या वास्तववादी मानवीय सहजप्रवृत्तीशी निगडीत जीवन, शब्दरुपाने मांडल्या आहेत.
नागनाथ विठ्ठलराव गायकवाड
0 REVIEWS FOR पुस्तकाचे नाव : प्रगती पुस्तक (कथा संग्रह)