शिवानं छपरातनं सायकल बाहेर काढली. धुळीनं माखलेली सायकल त्यानं मेढीला टेकवली. फाटक्या कापडानं त्यानं सायकलवरची धूळ झटकली. सायकलीच्या दोन्ही चाकांत हवा नव्हती. एका बाजूचा पायंडल तुटला होता. पुढच्या चाकावर मरगाड नव्हत. घंटी बंद होती. शिवानं पायंडल फिरवला तसा गंजलेल्या चैनचा कटकट आवाज आले. त्याला तेलपाणी करायला हवं. शिवा मनाशीच पुटपुटला मागच्या चाकावरच मडगार्ड मात्र धड होतं. त्यावर लिहिलं होतं देखो मगर प्यारसे शिवानं सायकलला तेल पाणी केलं अन् आईनं दिलेल्या वायरूपच्या पिशवीतल्या भाकरी हांडवेलला अडकवल्या अन् करुणानगरच्या रस्त्यानं सायकल चालवू लागला. सायकल चालवायलाही जड जात होती. शिवा जीवाच्या आकांताने सायकल चालवत होता. जोर लावून पायंडल खाली दाबत होता. सायकलच्या कर्कश आवाजानं रस्त्यावरची माणसं माग वळून बघत होती. तशी शिवाच्या सायकलला रस्ता सोडत होती. सायकल वरंगळीला लागल्यावर शिवाला बरं वाटत होतं. शिवाच्या डोक्यात अनेक विचार येत होते. आपण खूप नशीबवान आहोत. एम. ए. झाल्यावर आपणाला प्राध्यापकाची नोकरी मिळाली. सी. एच. बी. ची का असेना पण नोकरी मिळाली. बाहेर सेट, नेट, एमफिल, पीएच.डी. होऊन माणसे बेकारीत आहेत. त्यामानाने फक्त एम. ए. वर आपल्याला लवकर संधी मिळाली. या संधीतूनच आपण काय तरी करायला हवं. नेट, सेट परीक्षेला बसायला हवं. शिवाय एम फील करून घ्यावं. या विचारात असतानाच शिवानं रस्त्याकडचा बोर्ड वाचला.महात्मा फुले कला व वाणिज्य महाविद्यालय, करुणानगर......(पुस्तकातून)
0 REVIEWS FOR पुस्तकाचे नाव : वॉन्टेड