इ.स. २०१० पर्यंत माझे पंजोबा भिमराव विठ्ठल महामुनी हे किती शाहीर होते याची सुतराम कल्पना मला नव्हती. भिमराव महामुनी यांच्या `विद्याप्रकाश` पुस्तकामध्ये त्यांच्या जुन्नर तालुक्यातील राजुरी या गावाचा उल्लेख होता. त्यांचा कुणी वारसदार राजुरीमध्ये आहे काय? याची चौकशी करण्यासाठी राजुरी येथे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते तथा गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष विलासराव तांबे व त्यांचे सहकारी राजुरी येथे गेले तेव्हा त्यांना कळले की भिमरावांचे पणतू विठ्ठल महामुनी मंचर येथे राहतात. ते म्हणाले, “तुमचे पणजोबा भिमराव महामुनी इतके थोर प्रथितयश जलसाकार होते याची कल्पना तुम्हाला नाही. अर्थात तशा प्रकारचा पुरावा १०० वर्षानंतर आमच्याकडे नव्हताच.भिमरावांच्या थोरपणाच्या गप्पा ऐकल्यावर मी मंत्रमुग्ध झालो.. त्यांनी मला भिमराव महामुनी यांचा `विद्याप्रकाश` ग्रंथ भेट दिला.
0 REVIEWS FOR पुस्तकाचे नाव : विद्याप्रकाश