प्रत्येक माणूस जीवन जगण्यासाठी आपल्या परीने प्रचंड संघर्ष करीत जीवन जगतो. हा मानवी संघर्ष साहित्यिकाच्या साहित्याचा विषय बनतो. काव्य ही कल्पना व वास्तवतेचे मिश्रण असलेली कलाकृती जरी असली तरी वाचकांना निश्चितच विचार करायला लावणारी असते. कधीकधी कवीच्या मनातील भावभावना शब्दरूप घेऊन कागदावर कवितेच्या रूपाने अवतरतात. मी काही फार मोठा कवी नाही. अनुभवातून आलेले, जगलेले व भोगलेले क्षण यातून जे सुचेल ते लिहित जातो. काही गतकाळातील क्षण डोळ्यात पाणी आणून जातात. त्यातून शब्द एकापाठोपाठ येतात व कविता हातून रेखाटली जाते. ती जाणीव व नेणीवेच्या पलीकडची असते. मानवी मनातील भावभावनांचा सुंदर अविष्कार म्हणजे कविता असते. काही अनुभव घेतल्यावर तसेच घटना पाहिल्यावर मनात अचानक दाटून आलेली उर्मी माझ्या या काव्य संग्रह लेखनासाठी पुरेशी ठरली. समाजात फिरत असतांना आलेला अनुभव, पाहिलेले माणसांचे जगणे व माणसांचा चाललेला संघर्ष यांचा आलेख म्हणजे हा कविता संग्रह होय.
- डॉ. मधुचंद्र लक्ष्मण भुसारे
0 REVIEWS FOR पुस्तकाचे नाव : खेळ सावल्यांचा