होलीया म्हणजे हॉगबाँड. होलार या समाजाचा उद्गम होलिया जमातीपासून झाला असल्याचे जावीर कथन करतात. त्यासाठी मुंबई इलाख्यातील अठरापगड जाती ह्या ग्रंथाचा ते संदर्भ देतात. होलार ही अठरापगड जातींपैकी एक अतिउपेक्षित जमात या उपेक्षिततेचा उल्लेख जावीरांच्या अनेक कवितांमधून व्यक्त होतो. न्यूनगंड आणि अहंगंड याची बाधा कुणालाही होऊ शकते. अहंगंडामुळे माणूस रसातळाला पोचतो, असे आपण पाहतो तर न्यूनगंडामुळे माणूस रसा तळाला पोचतोच पोचतो परंतु शतकानुशतके तो तिथेच राहतो हेदेखील आपण नुसतेच पाहत राहतो. पूर्वापार चालत आलेली समाजव्यवस्था जातीपातीचा वृद्धिगत आकार ह्यामुळे माणसाला न्यूनगंडाने पछाडले. हा न्यूनगंड सर्वत्र आढळतो.
- वामन होवाळ
0 REVIEWS FOR पुस्तकाचे नाव : होलीया