ठिगळ अन् टाके आपल्या हाती देताना अतिशय आनंदित झालोय. जीवनातील असंख्य घटना समोर उभ्या राहताना दिसतात. आजची चळवळ, शिक्षण, व्यसन, सामाजिक भेद यासारखे विषय दिसतात. त्यावर भाष्य नोंदवतो.
आज शिक्षणाचे महत्त्व प्रत्येकाला पटलेलं आहे. विद्यार्थी, पालक, गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी प्रयत्नात दिसतो. त्यासाठी धडपडतदेखील असतो. आर.टी.ई. अंतर्गत प्रत्येक विद्यार्थ्यास (सहा ते चौदा वयोगटातील) सक्तीचा आणि मोफत शिक्षणाचा अधिकार कायद्यांतर्गत प्राप्त झालेला आहे. म्हणजेच प्राथमिक शिक्षण हे तरी मोफत मिळणार आहे. याचे श्रेय खरे म्हणजे महात्मा जोतिबा फुले, सावित्रीबाई फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांसारख्या महामानवास जाते. त्यांची तळमळ होती. शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे. जो ते प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. शिक्षण संघटन आणि संघर्ष यासारख्या प्रेरणादायी, महत्त्वाकांक्षी विचाराने बाबासाहेबांनी बहुजनास जागविले. आज शिक्षणाने माणूस बोलू लागलाय. प्रगती करतोय यातच खरा आनंद आहे. दलित, पीडित समाजास शिक्षण सहज सोपे नव्हते. प्रख्यात उच्च विद्याविभूषित प्रकांडपंडित डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचेच उदाहरण घ्या ना! वर्गाच्या बाहेर शिक्षण घेतले. आजच्या घडीला तेच आमचे आदर्श आहेत आणि त्या प्रेरणेनेच बहुजनवर्ग शिक्षणाकडे चिकाटीने वळला आहे.
राजेंद्र पारे
0 REVIEWS FOR पुस्तकाचे नाव : ठिगळ अन् टाके