आयुष्याचे उत्तरायण सुरु होते तेंव्हा कुटुंबाची गरज असतांना एकाकीपण वाट्याला येते आणि शोध सुरु होतो नव्याने जगण्याचा. फरक एवढाच असतो की, आयुष्याच्या संचितातून जी बंधने स्वतःवर लादून घेतली ती तोडतांना आणि नव्या आयुष्यात मिळणारे दुसरे प्रेम स्वीकारतांना केवळ प्रागतिक विचारच आधार बनतो. जीवन सुंदर असले तरी ते स्वीकारण्यासाठी आणि सजवण्यासाठी समृध्द वाटणाऱ्या अडगळीचा त्याग करावा लागतो. "दुसरे प्रेम” हे एकविसाव्या शतकातील जगण्याचा नव्याने विचार करायला लावणारे नाटक आहे. जागतिकीकरणाच्या स्पर्धात्मक युद्धात जेंव्हा माणसाचे जगणे कळसूत्री बाहुल्यांसारखे होते तेंव्हा "स्वातंत्र्य" कशाला म्हणतात हा प्रश्न भेडसावतो. अशाही परिस्थितीत स्वातंत्र्याचा शोध सुरु होतो तेंव्हा राष्ट्रवाद आणि जीवनमूल्य यांचा संघर्ष वास्तवाची जाणीव करून देते. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात आपण भारतीय कुठे आहोत याची जाणीव करून देणारे नाटक "फ्रीडम 75" आहे.
0 REVIEWS FOR पुस्तकाचे नाव : दुसरे प्रेम आणि फ्रीडम 75