रमेश जावीर या अपंग शिक्षकाने केलेली सप्तरंगी कला ची निमिर्ती पाहून कोणत्याही व्यक्तीला जीवनात आपण काही तरी उपयुक्त कार्य करु शकतो अशी प्रेरणा उत्पन्न झाल्याशिवाय राहणार नाही. मला असं सांगायचय... हा त्यांचा लेख वाचतांना मन हेलावून जावेत असे प्रसंग त्यांच्या बालपणात आले आहेत. त्यांनी स्वतः आत्मविश्वासाच्या बळावर परिस्थितीशी संघर्ष करून यश तर मिळविले आहेच त्याशिवाय मुलांच्या अंगी कलाकृतीच्या माध्यमातून मुलांचा आत्मविश्वास वाढविण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. आत्मविश्वासाची अंतीम अवस्था म्हणजे आत्मश्रध्दा स्वतःला संपूर्ण झोकून दिल्याशिवाय आत्मश्रध्दा ही अवस्था प्राप्त होत नाही. श्रध्दा हा असा पक्षी आहे की त्याला गर्द काळोखात सुध्दा प्रकाशाची चाहूल लागते. कमळ पुष्पाचा आस्वाद घेण्यासाठी कित्येक किलोमीटर अंतरावरून भ्रमर त्याठिकाणी पोहोचतो परंतु कमळाच्या देठाच्या पायथ्याशी चिखलात आयुष्यभर रुतून पडलेल्या बेडकाला मात्र याची जाणीव कधीच होत नसते. नदी वाहून जाऊन पूर्ण पाणी गेल्यानंतर आपण नदीपलीकडे जाऊ म्हणणारे काठावरच थांबतात आणि जे प्रवाहात उडी घालून पोहून जाण्याची पराकाष्टा करतात तेच नदी पार करु शकतात. रमेश जावीर या छंदवेड्या व धडपड्या शिक्षकाची जिद्द चिकाटी व तळमळ कुमारवयातील मुलामुलींना निश्चित दिशादर्शक ठरणार आहे.
- डॉ. वाय. के. शिंदे
0 REVIEWS FOR पुस्तकाचे नाव : सप्तरंगी कला