अंधाराकडून उजेडाकडे जाण्यासाठी सारेच धडपडतात.पण उजेडाकडून अधिक उजेडाकडे जाणारी माणसं फार थोडी असतात. मधुकर नवले (भाऊ) हे असेच एक प्रकाशपंख लाभलेले उर्जावान व्यक्तिमत्व आहे. अहमदनगर जिल्ह्यातील अकोले या क्रांतिकारी तालुक्यात मधुभाऊंचे डोंगराएवढे कर्तुत्व उभे आहे.सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक व सहकार अशा सर्वच क्षेत्रात मधुभाऊ नवले हे दीपस्तंभ बनले आहेत. एक सुसंस्कृत, सभ्य आणि भला माणूस म्हणून ते साऱ्यांच्याच आदराचे स्थान आहेत.
आपल्या राजकीय आणि सामाजिक जीवनाचा पट मांडताना मधुकर नवले यांना असंख्य माणसांचा स्नेह मिळाला. कुणी प्रेरणा दिली, कुणी आशीर्वाद दिले तर कुणी जीवापाड स्नेह जपला. या सर्वच माणसांचे ऋणानुबंध श्री.मधुकर नवले यांनी या पुस्तकात मांडले आहेत.
गाठी ऋणानुबंधाच्या हा मधुभाऊ नवले यांचा ग्रंथ अनेक अर्थाने महत्वाचा आहे. खरे तर गेल्या पाऊनशे वर्षांचा तो ऐतिहासिक दस्ताऐवज आहे. हा दस्ताऐवज मागच्या पिढीच्या कर्तुत्वाने जसा काठोकाठ भरला आहे तसाच तो पुढच्या कित्येक पिढ्यांसाठी मोठी प्रेरणा देणारा आहे.
-डॉ. मिलिंद कसबे.
0 REVIEWS FOR पुस्तकाचे नाव : गाठी ऋणानुबंधाच्या