शोषित, शोषक, दुःख, वेदना, चीड, विद्रोह इत्यादी कायम विश्वात असतोच आणि ती नष्ट व्हावी हा हेतू फक्त दलित साहित्यातून प्रगट होते. समानता रुजवण्याचे कार्य दलित साहित्यातून झाले आहे. ह्या प्रवाहाची निर्मिती त्या अंगाने झाली आहे. मुळात कुणीच कुणाचं शोषण करू नये. हा सामान्य विचार पण येथील व्यवस्थेने तो विचार कालबाह्य ठरविला. व्यवस्थेबद्दलची आक्रोशीय भावना वाङ्मयाच्या अंगाने दलित साहित्याने केली आहे आणि ही सगळी व्यवस्था बदलण्यास केवळ आणि केवळ डॉ. बाबासाहेब आंबेडकर हेच निमित्त आहे. भारतीय संविधानाच्या निमित्ताने हे सर्व घडलेले आहे.
१४ व्या शतकापासून ते १९६० पर्यंत साहित्यातील मूल्य हे स्थिर होते. गती आणि स्थितीत फारसा बदल झालेला नव्हता. म्हणून तात्कालिक प्रतिमा, रूपक समाजमान्य, समाजरूढ व चिरपरिचित असेच होते. नवी साधणं, नवी उपकरणं, वैचारिक, सामाजिक स्थितिबदलांमुळे या कलाकृतीच्या आशयात फारसा बदल आढळत नव्हता. म्हणून तात्कालिक साहित्यात बदल बघायला मिळत नव्हता आणि नाही.
१९५० नंतर भारतीय राज्यघटनेमुळे उपेक्षित, वंचित, शोषित समाजाला आपले अधिकार प्राप्त झाल्याने हा वर्ग लिहिता झाला. बदलत जाणाऱ्या परिस्थितीचे प्रतिबिंब हे साहित्यात उमटत गेले. विकसनशील राष्ट्रातील उपकरणे आणि संविधानातील अभिव्यक्ति स्वातंत्र्य हे भारतीय साहित्यातून मांडल्या गेले. हे आजच्या समकालीन साहित्यातून दिसून येत आहे. ह्याच प्रवाहात माझी कविता प्रवाहित आहे.
(प्रस्तावनेतून)
0 REVIEWS FOR पुस्तकाचे नाव : बिघडलेले होकायंत्र