इतिहासाबद्दलच्या चिंतनाचे भान हे गल्ली बदललेला मोर्चा या काव्यसंग्रहाचे एक प्रमुख वैशिष्ट्य असल्याने, ही कविता ज्यांच्या विषयी आहे त्यांच्या मनाशी सहृदय अंतःकरणाने परंतु तितक्याच तटस्थपणेही संवाद करताना दिसते. राम दोतोंडे यांनी त्यांच्या आयुष्यातील अनेक वर्षे नवा इतिहास घडवणाऱ्या समाज प्रबोधन आणि परिवर्तनाच्या चळवळीत घालवलेली असल्यामुळे त्यांचे वर्णन दलितांनी त्यांच्या मुक्तीसाठी काढलेल्या मोर्चातील एक ध्येयनिष्ठ सैनिक असे करता येईल. कालौघात या मोर्चाच्या ध्येयनिष्ठेलाच तडे गेले आणि प्रत्येक जात, जमात आपापल्याच हितात मग्न झाली. तेव्हापासुन अवाक व अतृप्त बनलेल्या मोर्चेकऱ्यांनी आपल्या मोर्चाचा मार्गच बदलला. तो काही काळ या स्वार्थी, हितसंबंधी व्यक्तींच्या गल्लीकडे धावला हे खरे परंतु त्याला त्याचा स्वतःचा मार्ग सापडल्याने ती गल्लीसद्धा त्याने बदलली. राम दोतोंडे यांच्या कवितेतील मोर्चाचे प्रतिक म्हणजे त्यांचा जीवनप्रवासच आहे.
-डॉ. रावसाहेब कसबे
0 REVIEWS FOR पुस्तकाचे नाव : गल्ली बदललेला मोर्चा