लोकवाटा` हा माझ्या नऊ प्रवासलेखांचा संग्रह आहे. गेल्या काही वर्षांमध्ये मी वेळोवेळी केलेल्या सहल प्रवासांवरचे हे लेखन आहे.
मला मनसोक्त भटकंतीचा छंद आहे. त्यामुळे मी आयुष्यभर सकारण अकारण भटकंती करीत आलो आहे. माझ्या भ्रमंतीला कोणताही प्रदेश, समाज, निसर्गरूप वर्ज्य नाही. अनेक गोष्टींबद्दलची जिज्ञासा मला भटकायला निमित्त होते. सहलीसाठी अनवट प्रवासमार्ग आणि तशीच ठिकाणे मला आवडतात. पण रुळलेल्या वाटांचेही मला वावडे नाही. किंबहुना अशा वाटांवरून भटकणे मी पसंत करतो.
खरे तर अजून असंख्य लोकवाटा भटकायच्या राहून गेल्या आहेत. परंतु माझ्या आजवरच्या भटकंतीवर आधारित माझे `लोकबाटा` हे सहलींच्या अनुभवांनी भरलेले पुस्तक वाचकांना नक्कीच आवडेल असा विश्वास वाटतो.
- मा. रा. लामखडे
0 REVIEWS FOR पुस्तकाचे नाव : लोकवाटा