ललित साहित्य व्यक्तीसापेक्ष मनाचा वेध घेत असते. साहित्य निर्मिती करताना सामाजातील समकालीन वास्तव, शिष्ट, अनिष्टपणा पचवून घेण्याची क्षमता लेखकांच्या ठिकाणी असते. सामजिक अनूभवाला कलात्मक रूप देण्याचा प्रयत्न साहित्यिक करत असतो. लेखकाचा प्रामुख्याने समकालीन वैचारिक जाणीवेशी संबंध येत असला तरी सकारात्मक या नकारात्मक भूमिका त्यांच्या व्यक्तीमत्वानुसार घेत असतो. लेखकाच्या पहिल्या कलाकृती पासून ते शेवटच्या कलाकृती पर्यंत दिसून येणारे वैविध्याचे कारण म्हणजे काळाप्रमाणे बदलणारे संस्कार आणि त्यामुळे परिवर्तित झालेली जीवन विषयक दृष्टी हेच होय. १९६० च्या नंतरचा कालखंडात रंगनाथ पठारे व राजन गवस या लेखकांचे व्यक्तीमत्व घडत गेले. हा कालखंड अभिव्यक्तीच्या दृष्टीने महत्वाचा कालखंड गणला जातो. याच कालखंडात ग्रामीण व दलित साहित्य प्रवाहाने वाङ्घयीन विश्वात स्वःताचे अस्तित्व निर्माण केले आणि प्रामुख्याने मानवी जाणीवा समृध्द केल्या. या वाङ्गयीन पर्यावरणात पठारे व गवस लेखकांचे व्यक्तीमत्व घडत गेले.
0 REVIEWS FOR पुस्तकाचे नाव : रंगनाथ पठारे आणि राजन गवस यांच्या निवडक कादंबऱ्यांचा तौलनिक अभ्यास