पुस्तकाचे नाव : वाजाप
- Category: Literature
- Author: रमेश जावीर
- Publisher: Pustakmarket
- Copyright By: सौ. सुवर्णा रमेश जावीर
- ISBN No.: 978-93-92466-81-6
Free
रमेश जावीर यांच्या डफावर मी लेखनीचा हात मारावा, असा आग्रह त्यांनी माझ्या जवळ धरला. म्हणूनच मी हा तोडा मारत आहे. तसं पाहिले तर मी आजपर्यंत कोणतं ही वाजाप केलेलं नाही. त्यामुळे अशी डफावर थाप मारण्याची माझी पात्रता आहे की नाही, हे मला माहित नाही. मात्र माझे असे मत झाले आहे की, रमेश माझे मित्र आहेत म्हणूनच कदाचित त्यांनी मला मित्रत्वाच्या नात्याने ही जबाबदारी सोपविली असावी. दुसऱ्याच्या नरड्यात टाकण्यापेक्षा आपल्या परडयात टाकावं कदाचित ही त्यांची भावना असेल.