प्रतिभेचे हिरवेगार पंख घेऊन साहित्य क्षेत्रात पहिलेवहिले पाऊल टाकणाऱ्या समीर रामदास यांचे मी स्वागत करतो. साहित्य क्षेत्रात नाविण्यासाठी अद्याप भरपूर जागा रिकामी आहे. ती त्यांनी आत्मविश्वासाने मिळवावी अशी सदिच्छा मी देतो. ‘शेलारवाड्याची बिल्डींग’ नावाचा हलकाफुलका कथासंग्रह घेऊन ते साहित्याच्या गावात येत आहेत. समीर यांचे निरीक्षण अतिशय सूक्ष्म आहे. मानवी जीवनातील, स्वभावातील बारीक – सारीक हालचाली ते सहजपणे टिपतात. सुंदर शब्दाची गुंफण करतात आणि वाचकांपर्यंत जातात. माणसाच्या स्वभावाचे असंख्य पैलू त्यांच्या लेखणीतून सहजपणे साकार झाले आहेत. सहजपणा नेहमीच सुंदर असतो. या सहजपणाला सजवण्यासाठी वेगळे प्रयत्न करावे लागत नाहीत. समीर यांनीही तसा प्रयत्न केलेला दिसत नाही. कथा वाचनीय आहेत. आशयाचे ढग आपल्या चोचीत पकडणाऱ्या आहेत. आपले अनुभवविश्व किती व्यापक आहेत हेही सहजपणे व्यक्त करणाऱ्या आहेत. मराठी वाचकाला त्या नक्कीच भावतील असा विश्वास मला वाटतो. - उत्तम कांबळे
0 REVIEWS FOR पुस्तकाचे नाव : शेलारवाड्याची बिल्डींग