शासकीय सेवेतील प्रदीर्घ अनुभव असलेले निवृत्त अधिकारी म्हणून, तसेच गेल्या पाच वर्षांपासून श्रीरामपूर तालुक्याचे आमदार म्हणून ग्रामविकासाचे सुंदर स्वप्न लहू कानडे यांनी पाहिले आहे. दै. सकाळच्या `अॅग्रोवन` या पुरवणीमधील त्यांच्या `स्वप्नातलं गाव` या लेखमालेत त्यांचे हे स्वप्न शब्दबद्ध झाले आहे. निवडणूक ही आपल्या स्वातंत्र्याची खून असते. म्हणून लोकशाहित निवडणूकीला सामोरे जाणाऱ्या प्रत्येक लोकप्रतिनिधीने आपल्या गावाच्या सर्वांगीण विकासाचे स्वप्न पाहिले पाहिजे. आमदार लहू कानडे यांनी हे स्वप्न पाहिले आहे. एक संवेदनशील कवी, लढावू कार्यकर्ता आणि कार्यक्षम लोकनेता जेव्हा असे समाजविकासाचे स्वप्न पाहतो आणि असे स्वप्न अनेकांना पडावेत अशी अपेक्षा करतो त्यातच आपल्या विकासाचे अनेक मार्ग दडलेले आहेत. त्याची पूर्तता व्हावी.(मलपृष्टावरून)
0 REVIEWS FOR पुस्तकाचे नाव : स्वप्नातलं गाव