अद्भुत चमत्कारिक आश्चर्यजनक या विशेषणांनी ज्याला संबोधले जाते. ते म्हणजे हे जग. याला दुसरी उपमा देताच येणार नाही. ज्ञात-अज्ञात अशा कितीतरी गोष्टींनी हे रहस्यमय जग भरले आहे. बुद्धी ही अशीच गूढमय गोष्ट आहे. मनुष्यप्राण्याने तिचा आधार घेऊन अनेक अज्ञात अशा पृथ्वी व आकाशांतील बाबींचा शोध घेतला आणि अजूनही शोध घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्याची जिज्ञासा त्याला स्वस्थ बसू देत नाही. आकाशातील सूर्य चंद्र तारे ग्रह कृष्णविवरे यांची गती त्यांचा जन्म-मृत्यू यांचा अभ्यास चालू आहे. पृथ्वीचा जन्म तेथील विविध प्रकारच्या प्राण्यांच्या प्रजाती वनस्पतींच्या प्रजाती मनुष्याच्या जाती उडणारे पक्षी प्राणी सरपटणारे चालणारे छोटे तसेच अवाढव्य शरीराचे जीव अतिसूक्ष्म जीवजंतु यांचे पृथ्वीवर कसे वास्तव्य होते कसे आहे याचा शोध घ्यावा असे मानवाला वाटत राहिले.
या जगाची निर्मिती कोणी केली? हा वादातीत प्रश्न असला तरी सर्व धर्मीयांना मान्य असलेली एक गोष्ट म्हणजे परमेश्वराचे अस्तित्व परमेश्वराने अनेक सजीवांना जन्माला घातले. त्याने आदिमानवालाही संजीवन दिले. जगाची उत्पत्ति लय यांचा आधार घेत घेत आदिमानवाने प्रगती चालू ठेवली. आपल्या सदृश्य आणखी मानवांची संख्या वाढविली. परमेश्वर त्याला दिसत नव्हता, परंतु समजत होता. आकाशातील सूर्य व चंद्र यांनाच तो देव मानत राहिला. मूर्तीरूपात त्यांची पूजा-अर्चा करीत राहिला. वेदीवर पशूंचा बळी देऊन यज्ञ करू लागला. उद्देश एकच अदृश्य अशा परमेश्वराला प्रसन्न करून घेणे. म्हणून मनोभावे त्याची आराधना प्रार्थना करीत राहिला.
0 REVIEWS FOR पुस्तकाचे नाव : शोध रहस्याचा