अर्जुन डांगळे हे दलित साहित्य आणि चळवळीतले मोठे नाव आहे. दलित पॅंथरच्या क्रांतिकारी एल्गाराचे ते साक्षीदार आहेत. राष्ट्रीय दर्जाचे लेखक, प्रागतिक चळवळींचे मार्गदर्शक, विचारवंत आणि राजकीय नेते म्हणून त्यांच्या योगदानाला मोठा सांस्कृतिक-सामाजिक आयाम आहे.
दलितांच्या चळवळीचे नेतृत्व तरुण पिढीकडे सोपवून जातीय प्रश्नाबरोबरच वर्गीय प्रश्न समजून घेतले पाहिजे ही अर्जुन डांगळे यांची अपेक्षा आजच्या घडीला महत्वाची वाटते. हे पुस्तक वाचकांच्या हाती देण्याची अनेक कारणे आहेत. यातले महत्वाचे कारण म्हणजे आज दलितांचे राजकारण एकीकडे विचारशून्य बनले आहे तर दुसरीकडे ते फाटाफुटीची कहाणी बनले आहे.
अशा थंडावलेल्या दलित चळवळीची कोंडी कशी फोडायची हा खरा प्रश्न आहे. ही कोंडी फोडण्यासाठी आजचे राजकीय नेते सक्षम नाहीत, हे आता वेगळे सांगण्याची गरज नाही. यासाठी खरी गरज आहे ती नव्या प्रश्नांना भिडण्याच्या नव्या सांस्कृतिक लढ्याची. या नव्या लढ्यासाठी अर्जुन डांगळे यांच्या लेखनात दडलेली विचारसूत्रे उपयोगी ठरणार आहेत.
0 REVIEWS FOR पुस्तकाचे नाव : परिवर्तनाच्या प्रवाहातले अर्जुन डांगळे