आजच्या काळात बंधुभाव, सामाजिक न्याय आणि विवेकाची शिकवण तरी कोणाला देणार? `सगरी दुनिया सयानी भैया !` सारेच शहाणे आहेत. ज्याच्यामध्ये खरं ज्ञान पाझरलं आणि करुणा निर्माण झाली, या करुणेनं वेडेपिसे होऊन समष्टीच्या कल्याणाची आस लागली, तो एक प्रकारे वेडाच आहे ! समाजातील विवेकी मन आज असे स्वतःलाच `बैराना` समजत आहे. भ्रष्टाचार वाईट आहे हे माहीत असूनही वाढतो आहे. अत्याचार, बलात्कार हे घृणास्पद, निषेधार्थं असूनही वाढताहेत. जातपंथ, भेदभाव अत्यंत वाईट आहेत. या विषमतेनं या देशाला सदैव गुलामीत ठेवले. घटनेनं कायद्यानेही विषवल्ली हटवली, तरीही जाती घट्ट केल्या जाताहेत. या सर्व कोलाहलात या देशाच्या संविधान संस्कृतीला व तत्त्वज्ञानाला घेऊन पुढे जाणारे मन विव्हळत आहे. `मै अकेला बैराना रे !`(मलपृष्टावरून)
0 REVIEWS FOR पुस्तकाचे नाव : जागर समतेसाठी